ऋतु चिंब पावसाचा
हिरवाईने नटला
असा हासत नाचत
आला श्रावण गोजिरा
ऊन पावसाचा खेळ
इंद्रधनुची कमान
स्वागताला सज्ज सारे
आला श्रावण साजिरा
पानं तरारून आली
रंग फुलाफुलांतून
धरतीच्या अंगोपांगी
आला श्रावण फुलोरा
पावसाची रूमझुम
जशी वाजती पैंजणे
खुळावत ,नादावत
आला श्रावण बावरा
प्रसिद्धी:-महाराष्ट्र टाइम्स ,नागपूर
