Saturday, August 8, 2020

श्रावण बावरा

 ऋतु चिंब पावसाचा

 हिरवाईने नटला

 असा हासत नाचत

 आला श्रावण गोजिरा

 ऊन पावसाचा खेळ

 इंद्रधनुची कमान

 स्वागताला सज्ज सारे

 आला श्रावण साजिरा

 पानं तरारून आली

 रंग फुलाफुलांतून

 धरतीच्या अंगोपांगी

 आला श्रावण फुलोरा

 पावसाची रूमझुम

 जशी वाजती पैंजणे

 खुळावत ,नादावत

 आला श्रावण बावरा


प्रसिद्धी:-महाराष्ट्र टाइम्स ,नागपूर


No comments:

Post a Comment

श्रावण बावरा

 ऋतु चिंब पावसाचा  हिरवाईने नटला  असा हासत नाचत  आला श्रावण गोजिरा  ऊन पावसाचा खेळ  इंद्रधनुची कमान  स्वागताला सज्ज सारे  आला श्रावण साजिरा ...